आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढीव पाणी:उर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा शहरासाठी वाढीव पाणी आरक्षण मंजूर : पालकमंत्री

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिवसा नगरपंचायतीसाठी ०.३० दलघमी वाढीव प्रमाणात पाण्याचा हक्क जलसंपदा विभागाकडून मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे शहराचा मंजूर पाण्याचा हक्क ०.९७८ दलघमी झाला आहे. तिवसेकरांसाठी भविष्यात मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी गुरुवार ५ रोजी सांगितले.

तिवसा शहराची २०३८ या वर्षातील लोकसंख्या विचारात घेऊन शहराला भविष्यात पाण्याची उपलब्धता असावी म्हणून वाढीव पाण्याचा हक्क मंजूर करण्याची मागणी होती. पालकमंत्र्यांकडून या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडून जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याला मंजुरी मिळाली आहे. घरगुती पिण्यासाठी सिंभोरा येथील उर्ध्व वर्धा प्रकल्पातून (नल- दमयंती जलाशय) मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क मंजूर करण्यात आला आहे.

तिवसा शहरासाठी पूर्वीचे ०.६७८ दलघमी पाणी आरक्षण मंजूर होते. आता ०.३० दलघमी वाढीव हक्क मिळाल्याने एकूण ०.९७८ दलघमी पाणी तिवस्यासाठी आरक्षित झाले आहे. तसा शासन निर्णय जलसंपदा विभागाने निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे पुढील अनेक वर्षांसाठी तिवसा शहराला मुबलक पेयजलाची सुविधा निर्माण झाली आहे.

तिवसा नगरपंचायत सेवा क्षेत्रात बंदिस्त नलिका मल:निसारण व्यवस्था व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. एकात्मिक राज्य जल आराखड्यानुसार नगरपंचायतीने प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या कमीत कमी ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करून ताज्या पाण्याची गरज कमी करण्याचीही सूचना देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...