आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय जनसंचार संस्थानच्या (आयआयएमसी) स्थानिक पश्चिम क्षेत्रीय केंद्राच्यावतीने आगामी ६ जानेवारी या मराठी पत्रकार दिनानिमित्त ‘संपादक संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयआयएमसीचे महासंचालक प्रा. डॉ. संजय द्विवेदी (दिल्ली) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने आणि गजानन निमदेव हे ‘मराठी पत्रकारितेचे बदलते स्वरूप’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाच्या सभागृहात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. भारतीय जनसंचार संस्थानचे पश्चिम क्षेत्रीय संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र कुमार भारती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख आणि मराठी व हिंदी भाषा विभागप्रमुख प्रा. डॉ. मोना चिमोटे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनदेखील लावण्यात येणार आहे.
पत्रकारिता दिनाचे औचित्य
‘संपादक संवाद’ हा उपक्रम मराठी पत्रकारिता दिनाचे औचित्य साधून सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्रातील विविध प्रसारमाध्यमाचे संपादक विद्यार्थ्यांशी वेळोवेळी संवाद साधणार आहेत. त्याचा विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार तसेच इच्छुकांना लाभ होईल. दरम्यान या कार्यक्रमाला सर्व संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रा. अनिल जाधव, डॉ. राजेश कुशवाहा, डॉ विनोद निताळे, डॉ आशिष दुबे, संजय पाखोडे आदींनी केले आहे.
दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या सदर केंद्रांमध्ये इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेतील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्रारंभी इंग्रजी भाषेनेच या संस्थेची अमरावतीत पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर कालांतराने मराठी भाषेतील अभ्यासक्रमही सुरु करण्यात आला. लवकरच या संस्थेची स्वतंत्र इमारत उभी होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.