आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे संचालक मंडळ बिनविरोध:क्षेत्रीय वनकर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी इंद्रजीत बारस्कर

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती वनवृत्त क्षेत्रीय वन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून अध्यक्षपदी इंद्रजीत बारस्कर यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार अमरावती वनवृत्त क्षेत्रीय वन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या (40) संचालक मंडळाची निवडणूक अलिकडेच घोषित करण्यात आली होती. त्यानुसार सर्व पदाधिकारी, सदस्य व भागधारकांनी एकत्र बसून संचालक मंडळ अविरोध विजयी केले.

पुढे अध्यक्षपदी इंद्रजीत बारस्कर यांची दुसऱ्यांदा सर्वानुमते निवड करण्यात आली. इतर पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष मीनाताई राणे, सचिव प्रशांत उमक, खजिनदार सुशांत काळे, संचालक गजय लांबाडे, राजेश धुमाळे, नंदकिशोर ठाकरे, माणिक घोडेराव, स्वप्निल वानखडे, राजेंद्र गांजरे व रिना पवार यांचा समावेश आहे.

अध्यासी अधिकारी तथा मोर्शीचे सहायक निबंधक नंदकिशोर दहिकर यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. संस्था सचिव राजेश घोगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले. याप्रसंगी महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेचे बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

इंद्रजित बारस्कर यांनी यापूर्वीही सदर पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. त्यांच्या कारकिर्दीत ही संस्था अत्यंत सचोटीने व्यवहार करीत आहे. वनकर्मचाऱ्यांना वेळीच कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी मदतीला धावणे आणि सामाजिक भान जपून वर्षभर उपक्रम साजरे करत करीत राहणे ही या संस्थेची वैशिष्ट्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...