आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचआयव्ही संक्रमितांना उपचाराच्या ठिकाणीच शासकीय योजनांची माहिती द्या:मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एचआयव्ही संक्रमितांसाठी असलेल्या तसेच इतरही योजनांचा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सेवा पंधरवड्यातंर्गत विशेष मोहीम राबवा. एचआयव्ही संक्रमितांना जेथे औषधोपचार मिळतो, तेथेच शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.

एचआयव्ही संक्रमितांसाठी भेदभावाची वागणूक देणाऱ्या व्यक्ती, कार्यालय, आस्थापना, दवाखान्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असते. असे प्रकार घडू नयेत यासाठी एचआयव्ही एड्स कायदा, 2017 ची अंमलबजावणी कठोरपणे करावी, असे सांगून पंडा म्हणाले की, एचआयव्ही संक्रमित व्यक्तीसमवेत कुठल्याही कार्यालय किंवा आस्थापनेत भेदभावाची वागणूक ठेवल्यास अथवा त्याला संकोच वाटेल असे वक्तव्य, कृती केल्यास संबंधित व्यक्ती व आस्थापनेवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

यांची होती उपस्थिती

जिल्हाधिकारी कार्यालयात एड्स जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत घोडाम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अजय साखरे, जिल्हा स्त्री रोग तज्ज्ञ संघटनेच्या सचिव डॉ. अनिता बोबडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री नांदुरकर, डॉ. रवींद्र कलोडे, डॉ. सुशीला राजपूत, डॉ. पद्माकर सोमवंशी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

संक्रमितांच्या आहारासंबंधी चर्चा

खासगी किंवा शासकीय रूग्णालयात एचआयव्ही संक्रमितांना उपचारास नकार देणे, भेदभाव करणे, कलंकित करणे असे प्रकार झाल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. यावेळी एचआयव्ही संक्रमितांच्या आहारासंबंधी चर्चा करण्यात आली.

काटेकोर पालन व्हावे

प्राथमिक आरोग्य केंद्रातील पारिचारिकांनी (एएनएम) गर्भवती स्त्रियांची तपासणी निकषांनुसार गरोदरपणाच्या काळात दोनवेळा केली पाहिजे. त्याचे काटेकोर पालन व्हावे. सिकलसेल, हिमोफेलिया, थायलोसेमिया, तसेच एचआयव्हीबाधितांसाठी खासगी रक्तपेढ्यांनी 10 टक्के रक्त राखीव ठेवून ते 50 टक्के दराने उपलब्ध करून दिले पाहिजे. या बाबींचे काटेकोर संनियंत्रण करावे, असेही ते यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...