आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाहीत:वरुड येथे विविध भागात  मुख्याधिकाऱ्यांतर्फे पाहणी

शेंदुरजनाघाट6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड शहरात नव्याने तयार झालेल्या रहिवासी परिसरात अनेक नागरी सुविधांचा अभाव आहे. सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाहीत. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब लक्षात घेवून वरुडच्या मुख्याधिकाऱ्यांनी शहराच्या विविध भागांचा पाहणी दौरा करीत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात.

या वेळी मुख्याधिकाऱ्यांनी गोविंद विहार, साईसृष्टी, साक्षी नगर, भिकुजी नगर, लक्ष्मी नगर, शिव नगर आदी भागांना भेटी दिल्यात. माजी नगरसेवक धनंजय बोकडे यांना उपोषणाचा इशारा देताच मुख्याधिकाऱ्यांनी पाहणीदरम्यान त्वरित यंत्रणा कामाला लावली. चिखलमय झालेल्या रस्त्यांवर मुरुम टाकण्याचे आदेश दिलेत, तर येणाऱ्या काळात नाल्या व पक्के रस्ते करण्याचे आश्वासनदेखील दिले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...