आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:विद्यापीठाद्वारे पुनर्मूल्यांकन पत्रासोबत मूळ गुणपत्रिका जमा करण्याच्या सूचना

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारे उन्हाळी परीक्षेपासून विद्यार्थ्यांसाठी पुनर्मूल्यांकन, फोटोकॉपी (सॉफ्टकॉपी) तथा रिड्रेसलची सुविधा सुरू करण्यात आली आहे. बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. व अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी विद्यापीठाच्या https//sgbau.ucanapply.com या संकेतस्थळावरून आवेदनपत्र भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे, तसेच वरील परीक्षेच्या व्यतिरिक्त इतर परीक्षांसाठी ww.redressal.sgbau.ac.in या संकेतस्थळावरून पुर्वीच्या पद्धतीने पुनर्मूल्यांकन, फोटोकॉपी तथा रिड्रेसलकरिता आवेदनपत्र भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना: विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन (रिअसेसमेंट/ रिड्रेसल) आवेदनपत्रासोबत मुळ गुणपत्रिका व शुल्क भरलेल्या पावतीसह विद्यापीठातील गोपनीय विभागामध्ये आवेदनपत्र तातडीने जमा करावयाचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ऑनलाईन गुणपत्रिकेच्या प्रतींसह पुनर्मूल्यांकन आवेदनपत्र स्वीकारण्यात आलेले आहेत.

मुळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर त्या गोपनीय विभागामध्ये जमा करण्याचे विद्यार्थ्यांना सुचित करण्यात आले होते,परंतु अद्यापही बऱ्याच विद्यार्थ्यांनी मुळ गुणपत्रिका जमा केलेल्या नाहीत. त्यामुळे पुनर्मूल्यांकनावर त्याचा परिणाम झाला असून ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही आवेदनपत्रासोबत मुळ गुणपत्रिका जमा केल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी तत्काळ त्या गोपनीय विभागामध्ये जमा करावयाच्या आहेत, तसेच जे विद्यार्थी मुळ गुणपत्रिका जमा करणार नाहीत, त्यांचे पुनर्मूल्यांकन आवेदन अध्यादेश तथा निदेशातील तरतुदींनुसार रद्द करण्यात येतील, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास अधिक माहितीकरिता परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाली तोटे-पाटील यांच्याशी प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...