आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:विद्यापीठाच्या सर्व‎ महाविद्यालयांना सूचना‎ ; महाविद्यालयीनसह इतर शुल्काकरिता‎ विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नका‎

‎अमरावती‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती‎ विद्यापीठाच्या लेखी परीक्षा सुरू‎ झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना‎ महाविद्यालयीन शुल्क व इतर‎ शुल्क त्यांना नियमानुसार भरावे‎ लागते, परंतु ज्यांनी व्यक्तिगत व‎ आर्थिक अडचणींमुळे‎ महाविद्यालयामध्ये शुल्क जमा केले‎ नसेल, अशा विद्यार्थ्यांना‎ विद्यापीठाच्या परीक्षेपासून वंचित‎ ठेवू नये, अशा सूचना विद्यापीठाचे‎ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे‎ संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी‎ पत्राद्वारे सर्व संलग्नित‎ महाविद्यालयांना दिल्या आहेत.‎

परीक्षेपासून कुठलाही विद्यार्थी‎ वंचित राहू नये याकरिता जे विद्यार्थी‎ आर्थिक अडचणीमुळे संपूर्ण शुल्क‎ भरू शकत नसेल, तर त्यांना‎ टप्प्याटप्प्याने महाविद्यालयीन व इतर‎ शुल्क भरण्याची सुविधा देण्यात‎ यावी, असेही उा. देशमुख यांनी‎ सांगीतले आहे. परीक्षा ही‎ विद्यार्थ्यांच्या जीवनात अतिशय‎ महत्त्वाची बाब असते. वर्षभर तो‎ अभ्यास करतो आणि परीक्षेला‎ सामोरे जातो. अशा प्रसंगी शुल्क‎ भरले नसल्यास कोणताही विद्यार्थी‎ परीक्षेपासून वंचित राहणार नाही,‎ याची दक्षता महाविद्यालयाला‎ घ्यावयाची असून जर विद्यार्थी‎ परीक्षेपासून वंचित राहिल्यास‎ याबाबतची संपूर्ण जबाबदारी‎ महाविद्यालयाची असेल.‎

महाविद्यालयांनी याबाबत नोंद‎ घ्यावी, असे आवाहन डॉ. हेमंत‎ देशमुख यांनी केले आहे.‎ विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शुल्क‎ भरण्याची सुविधा महाविद्यालयांनी‎ द्यावी, याबाबत परीक्षा विभागाने‎ सर्व संलग्नित महाविद्यालयांना‎ पत्राद्वारे कळवले आहे. याशिवाय‎ विद्यार्थ्यांना काही अडचण‎ असल्यास त्यांना परीक्षा व‎ मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.‎ हेमंत देशमुख, कुलसचिव मोनाली‎ तोटे पाटील, सहाय्यक कुलसचिव‎ अनिल काळबांडे, सहाय्यक‎ कुलसचिव राहुल नरवाडे व‎ सहाय्यक कुलसचिव मिलिंद‎ देशपांडे यांच्याशी संपर्क साधण्याचे‎ आवाहन विद्यापीठाद्वारे करण्यात‎ आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...