आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुट:31 डिसेंबरपर्यंत मालमत्ता कर भरल्यास व्याज; दंड माफ

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरवासीयांनी मालमत्ता कर ३१ डिसेंबरपर्यंत भरल्यास त्यांना व्याज व दंड (शास्ती) पूर्णत: माफ केला जाईल, अशी घोषणा बुधवार २३ रोजी मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांनी केली. कर वेळेवर न भरणाऱ्या नागरिकांवर महिन्याला २ टक्के व्याज व दंड आकारला जातो.

हा दंड ज्यांना टाळायचा आहे, त्यांच्यासाठी मनपाद्वारे विशेष योजना मनपाने तयार केली असून ३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांना १०० टक्के, ३१ जानेवारीपर्यंत ७५ टक्के, २८ फेब्रुवारीपर्यंत ५० टक्के आणि ३१ मार्चपर्यंत व्याज व दंडातून २५ टक्के सुट दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...