आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:मजीप्रा बिलांवरील व्याज माफी आता ३० सप्टेंबरपर्यंत; थकीत पाणीपट्टीधारक नागरिकांना दिलासा

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थकीत पाणीपट्टी ग्राहकांसाठी राबवली जाणारी व्याजमाफीची ‘अभय योजना’ आता ३० सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार ती संपुष्टात आली होती. परंतु आता तिला मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गेल्या २१ जानेवारी २०२२ रोजी ही योजना जाहीर केली. या योजनेनुसार थकबाकी दार ग्राहकाने एकरकमी रक्कम भरल्यास पहिल्या तिमाहीत शंभर टक्के व्याज माफी देण्यात येते. दुसऱ्या तिमाहीत भरल्यास ९० टक्के, तिसऱ्या तिमाहीत ८० टक्के तर चौथ्या तिमाहीत ७० टक्के व्याज माफी केली जाते. त्यामुळे आगामी ३० सप्टेंबरपर्यंत थकबाकी दार ग्राहकांनी एकरकमी रक्कम भरल्यास १०० टक्के व्याज माफी दिली जाणार आहे. दरम्यान, केंद्र शासनाच्या या अभय योजनेचा लाभ जास्तीत जास्त थकबाकी दार ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तथा जलव्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक सोळंके यांनी केले आहे. ‘मजीप्रा’ च्या या थकीत पाणीपट्टीधारकांना दिलासा देणाऱ्या मुदतवाढीच्या निर्णयाचा अनेक नागरिकांनी स्वागत केले.

सूट जानेवारी २०२३ पर्यंतच नोंदणी करणे आवश्यक
पाणी पट्टी थकबाकी व त्यावरील विलंब आकार यासाठी लागू करण्यात आलेली अभय योजना २१ जानेवारी २०२२ ते २० जानेवारी २०२३ या एका वर्षाच्या कालावधीकरिता मर्यादीत आहे. अभय योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांनी ‘मजीप्र’ाच्या उपविभाग कार्यालयात किंवा वसुली कर्मचाऱ्याकडे अर्जासह ५ रूपयांचे शुल्क भरून आपल्या नावाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. अभय योजनेत समाविष्ट होणाऱ्या थकबाकी दार ग्राहकांना विहित कालावधीत मुळ पाणी बिलाची थकबाकी भरणे बंधनकारक आहे.

बातम्या आणखी आहेत...