आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोल्याशी संलग्न श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात जागतिक तृतीयपंथी ओळख दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने ‘किन्नरांचे भावविश्व’ या परस्परसंवादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व निवडणूक साक्षरता मंडळाने या कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शशांक देशमुख होते. तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून तृतीयपंथी व्यक्तींकरिता कार्य करणाऱ्या समर्पण या सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष हेमंत टोकशा व आंचल चव्हाण उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना हेमंत टोकशा म्हणाल्या, किन्नर संस्कृती ही अनादी काळापासून असून, यांना समाजाने स्वीकारण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकशाही सदृढ करण्याकरिता तृतीयपंथी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे अतिशय महत्वाचे आहे. आंचल चव्हाण यांनी शिक्षित असूनसुद्धा तृतीयपंथी असल्यामुळे येत असलेल्या अडचणी विशद केल्या. वाईट चालिरिती, कुप्रथा व सोप्या पद्धतीने पैसा कमावण्याच्या सवयीमुळे ह्या लोकांबद्दल समाजात असलेली भीती यावर विस्तृत मत प्रदर्शनही केले. यावेळी कार्यक्रमाध्यक्षांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी काही प्रश्नही विचारले. त्याची उत्तरे संबंधित वक्त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे संचालन, प्रास्तविक व पाहुण्यांचा ओळख परिचय राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनेश देशमुख यांनी करुन दिला. आभार प्रा. कल्पना पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण महर्षी, कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रक्षेत्रावरील कर्मचारी व विद्यार्थीे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.