आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजपुरवठा:नायगाव, वरुड बगाजी येथील खंडित वीजपुरवठा 24 तासांच्या आत सुरळीत

धामणगाव रेल्वे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नायगाव व वरुड बगाजी या परिसरात मंगळवारी उद््भवलेल्या वादळी वाऱ्यामुळे या परिसरातील १५ ते २० विद्युत खांब कोसळून ठिकठिकाणी तार तुटले होते. अशाही परिस्थितीत मंगरूळ दस्तगीर येथील महावितरण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी उपकार्यकारी अभियंता राठोड यांच्या मार्गदर्शनात व मंगरूळचे इंचार्ज सहाय्यक अभियंता अख्तर खान यांच्या नेतृत्वात सतत काम करून केवळ २४ तासांच्या विद्युत पुरवठा सुरळीत केला.

नायगाव येथे आलेल्या वादळाने अनेक घरावरील टीनपत्रे उडाले होते, तसेच जवळपास ३० ते ४० झाडे व १५ ते २० विजेचे खांब कोसळले होते. यामुळे मंगळवारी रात्री नऊ वाजेपासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर महावितरणचे सहाय्यक अभियंता अख्तर खान याच्या नेतृत्वात वरिष्ठ तंत्रज्ञ विशाल मेश्राम, निकेश इंगळे, प्रकाश राऊत, विठ्ठल डोईफोडे, सुनील पडघन, लाईन मन लाडके, वाहन चालक राहुल मनवरे, सहाय्यक कर्मचारी प्रणय गावनेर, बाह्य स्त्रोत कर्मचारी राम मुळे, श्याम मुळे, स्वप्निल झोपाटे, रुपेश निचत आदींनी रात्रंदिवस काम करून कोसळलेले विद्युत पोल पूर्ववत उभे केले व सर्व तारा जोडत केवळ २४ तासांच्या आत बुधवारी सायंकाळी सात वाजता विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू केला. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. दरम्यान, एव्हाना वादळामुळे वीज खांबांच्या तारा तुटल्या की दोन दिवस वीज गूल असा आजवरचा अनुभव होता.

बातम्या आणखी आहेत...