आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुन्हे शाखेच्या पोलिसांनी ३ मार्चला तीन तस्करांना ३०० ग्रॅम एमडीसह अटक केली आहे. या तिघांमध्ये शहरातील शोएब अहमद शेख हसन यालाही पकडले आहे. शहरातील व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येपूर्वी शहरातील एका मोबाइल शॉपी चालकाला धमकवण्यात आले होते. त्या धमकी प्रकरणात ‘एनआयए’ला शोएब अहमदचा शोध होता. दरम्यान, त्याला अटक केल्याची माहिती शहर पोलिसांनी ‘एनआयए’ला दिली. त्यामुळे ‘एनआयए’ पथकाने शनिवारी (दि. ११) शहरात येऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे उमेश कोल्हे यांची २१ जून २०२२ ला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणावरून देशभरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच शहरातील एका मोबाइल शॉपी चालकाला धमकी आल्याची बाब समोर आली होती. त्या धमकी प्रकरणात ‘एनआयए’ला शोएबची चौकशी करायची होती. मात्र शोएब त्यावेळी ‘एनआयए’समोर हजर झाला नाही. दरम्यान, आता त्याला एमडी प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. ‘एमडी’ प्रकरणात शोएबची १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी गुन्हे शाखेला मिळाली आहे. त्याचदरम्यान शनिवारी ‘एनआयए’चे पथक शहरात आले असून, त्यांनी शोएबची चौकशी सुरू केली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत ‘एनआयए’चे पथक शहरातच होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.