आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमारत दुर्घटना:त्या इमारत दुर्घटनेचा तपास खोलापुरी गेट ठाणेदारांकडे

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रभात चौकातील इमारतीच्या मलब्याखाली दबून पाच व्यक्तींचा बळी गेला आहे. ही घटना ३० ऑक्टोबरला घडली होती. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आतापर्यंत केलेला तपास समाधानकारक नसल्याचा ठपका ठेवून पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी खोलापुरी गेटचे ठाणेदार गजानन तामटे यांच्याकडे तपास देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता पीआय तामटे करणार आहेत.

कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. तसेच मनपाच्या दोन अधिकाऱ्यांनाही या प्रकरणात सहआरोपी केले आहे. मात्र, त्या दोन अधिकाऱ्यांपैकी एकही आतापर्यंत कोतवाली पोलिसांच्या हातात आला नाही. शिवाय तपास पाहिजे त्या गतीने पुढेसुद्धा सरकला नाही, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू आहे.

या प्रकारामुळे पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलिसांकडून काढून घेतला आहे. तसेच कोतवाली पोलिसांनी केलेल्या तपासात काही त्रुटी आहे का? याबाबत पोलिस उपायुक्त आणि सहायक पोलिस आयुक्त यांना माहिती घेण्याबाबत पोलिस आयुक्तांनी सूचवले. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत सखोल माहिती घेऊन अहवाल पोलिस आयुक्तांना सादर करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...