आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदल्या:सिंचन, आरोग्य विभागातील 52 कर्मचाऱ्यांच्या बदल्या; जिल्हा परिषदेत समुपदेशनाने पार पडली बदलीची प्रक्रिया

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत शुक्रवारी सिंचन आणि आरोग्य विभागातील ५२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या आहेत. यामध्ये आरोग्य सेविका, आरोग्य साहाय्यिका, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक पुरूष व औषध निर्माता याचा समावेश आहे तर सिंचन विभाग, जलसंधारण अधिकारी यांची बदली करण्यात आली.

जिल्हा परिषदेत मंगळवारपासून सुरू करण्यात आलेल्या बदली प्रक्रियेत चार दिवसांमध्ये २३० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत तर यामध्ये मेळघाटात १८ कर्मचाऱ्यांची तर सपाटीवर २१ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. जिल्हा परिषदेत १० ते १३ मे दरम्यान बदली प्रक्रिया राबवण्यात आली होती. याअंतर्गत मंगळवारी ८१,बुधवारी ४६ तर गुरुवारी ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक पुरूष यांच्या बदल्या झाल्या.

यामध्ये १० कर्मचाऱ्यांच्या सपाटीवर तर १० कर्मचाऱ्यांची मेळ घाटात विनंती आणि प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. ३४ ग्रामसेवक आणि १७ आरोग्य सेवकांच्या बदल्या केल्या. तर शुक्रवारी शेवटच्या दिवशी सिंचन आणि आरोग्य विभागातील ५२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. ही बदली प्रक्रिया सीईओ अविश्यांत पंडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्या उपस्थितीत पार पडल्या.

बातम्या आणखी आहेत...