आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपात्र‎:इसापूर ग्रामपंचायत सरपंचासह दोन‎ सदस्य जिल्हाधिकाऱ्यांतर्फे अपात्र‎

परतवाडा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचलपूर पंचायत समिती अंतर्गत‎ येणाऱ्या इसापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचासह दोन‎ सदस्यांना शासकीय जागेवर अतिक्रमण केल्या‎ प्रकरणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले.‎ मालु रविंद्र ठाकरे, वनिता अनिल ठाकरे, माधुरी‎ जयकुमार ठाकरे, असे अपात्र ठरवलेल्या सरपंच‎ व सदस्यांची नावे आहेत.

या प्रकरणी अनिकेत‎ भाऊसाहेब ठाकरे यांनी तक्रार दाखल केली होती.‎ खुल्या सरकारी जागेत शासकीय दस्तावेजात‎ खोडतोड करून खोट्या स्वरुपात ८-अ मिळवित‎ सरकारी जागेवर अतिक्रमण केले, तर सुधाकर‎ बाहे यांनी वनिता अनिल ठाकरे व माधुरी जयकुमार‎ ठाकरे यांनीही अतिक्रमण केल्याची तक्रार केली.‎ या तक्रारीच्या आधारावर अप्पर जिल्हाधिकारी‎ यांनी इसापूर येथे सरपंच व दोन सदस्यांना अपात्र‎ ठरविल्याचे आदेश केले. या कारवाईत ॲड. पंकज‎ महल्ले व ॲड. राहुल सातपुते यांनी केलेला‎ युक्तीवाद यशस्वी ठरला.‎

बातम्या आणखी आहेत...