आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णपदक‎:ईशानी बोरकरला एकल‎ नृत्य स्पर्धेत सुवर्णपदक‎

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेड्डीज इंग्लिश स्कुलची पहिल्या‎ वर्गातील विद्यार्थिनी ईशानी किशोर बोरकर हिने‎ माउंट एव्हरेस्ट इंटरनॅशनल सिंगिंग, डान्स चॅम्पियन‎ या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत क्लासिकल या‎ सोलो(एकल) नृत्य प्रकारात सुवर्णपदक पटकवले‎ आहे.

३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर यादरम्यान काठमांडू,‎ नेपाळ येथे ही स्पर्धा घेण्यात आली. क्लासिकल‎ नृत्य प्रकारात सोलो (एकल) गटात भारत, भूतान,‎ नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान या देशातील‎ स्पर्धकांनी सहभाग घेतला असून यामध्ये भारताचा‎ प्रथम क्रमांक आला आहे. तर ईशानी बोरकर या‎ विद्यार्थीनीने सुपर्णपदकही मिळविले आहे.‎ ईशानीच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी,‎ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईशानीचे अभिनंदन‎ केले आहे. जय भारत शिक्षण प्रसार मंडळाचे‎ सचिव संजय हिंगासपुरे, रेड्डीज इंग्लिश स्कुलच्या‎ मुख्याध्यापिका, तसेच शाळेतील शिक्षक व‎ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ईशानीचे कौतुक केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...