आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंड वाऱ्यांचा परिणाम:जिल्ह्यात थंडी वाढली; तापमानात 3 अंशांनी घट

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी थंडी कडाडली. पारा ३ अंश सेल्सियसने घसरल्याची माहिती भारतीय हवामान केंद्राने दिली.अमरावती जिल्ह्यात १८.५ अंशावरून तापमान १५.५ अंशांपर्यंत खाली आले. अफगाणिस्तानकडून आलेल्या पश्चिमी चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील तापमान वेगाने खाली घसरले. तिकडे बर्फवृष्टीसह काही ठिकाणी पाऊसही होत आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्य काश्मीर, लड्डाख, व हिमाचल प्रदेशात थंडी वाढली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम जिल्ह्यातील तापमान घटण्यात झाल्याची माहिती मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...