आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद:अर्थसंकल्प पदाधिकाऱ्यांविना‎ सादर होण्याची पहिलीच वेळ‎ ; अंतिम मंजुरीची शक्यता‎

अमरावती‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिनी मंत्रालय म्हणून ओळख‎ असलेल्या जिल्हा परिषदेचा‎ अर्थसंकल्प येत्या २० ते २२ मार्चदरम्यान‎ अंतिमत: मंजूर केला जाणार आहे.‎ गतवर्षी २० मार्चला कार्यकाळ संपुष्टात‎ आल्यामुळे जिल्हा परिषद सध्या‎ पदाधिका रीविहीन आहे. त्यामुळे त्यांच्‎ याविनाच प्रशासकीय पातळीवर हा‎ अर्थसंकल्प सादर केला जाऊन मंजूर‎ केला जाईल. दरम्यान पदाधिकाऱ‎ ्यांविना मंजूर केला जाणारा अलिक च्या‎ काळातील हा पहिलाच अर्थसंकल्प‎ आहे.‎ जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांकडून‎ आलेल्या मागणीच्या आधारे हा‎ अर्थसंकल्प गेल्या महिन्यातच तयार‎ करण्यात आला. दरम्यानच्या काळात‎ झालेल्या बैठकीत वेगवेगळ्या विभागप्‎ मुखांनी पुरवणी मागण्यांच्या अनुषंगाने‎ काही सुधारणा देखील मांडल्या. त्यांचा‎ अंतर्भाव करुन आगामी २० ते २२‎ मार्चदरम्यान तो अंतिमत: मंजूर केला‎ जाणार असल्याचे संबंधित विभागाचे‎ म्हणणे आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य‎ वित्त व लेखा अधिकारी (कॅफो)‎ चंद्रशेखर खंडारे यांच्या कार्यालयाने हा‎ अर्थसंकल्प तयार केला आहे.‎ जिल्हा परिषदेत पन्नासावर वेगवेगळे‎ विभाग आहेत. त्या सर्व विभागांचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रतिबिंब या अर्थसं कल्पात उमटणार‎ असून सन २०२२-२३ या मावळत्या‎ वर्षातील जमा-खर्च आणि सन‎ २०२३-२४ या आर्थिक वर्षातील‎ जमा-ख ्चाचा ताळेबंदही या अर्थसं‎ कल्पात दिसून येणार आहे. जिल्ह्याच्या‎ ग्रामीण भागाचा विकास जिल्हा परिषदे‎ मार्फत केला जातो. गाव-खेड्य‎ ंसाठीच्या अनेक योजना देखील याच‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यंत्रणेमार्फत राबवल्या जातात. काही‎ विषयांच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेला‎ थेट केंद्र आणि राज्य शासन कडून निधी‎ प्राप्त होतो. अशाप्रकारे जिल्हा परिषदेचा‎ स्व निधी आणि केंद्र व राज्य‎ सरकारतर्फे वेळोवेळी मिळणारा निधी,‎ अनुदाने, उपदान आदींची स्पष्टता सदर‎ अर्थसंकल्प सादर झाल्य नंतरच स्पष्ट‎ होईल.‎

संपूर्ण तयारी अंतिम‎ टप्प्यात‎ जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प‎ दरवर्षी ज्याप्रमाणे सादर केला‎ जाऊन मंजुर केला जातो,‎ त्याचप्रमाणे तो यावर्षीही मंजूर‎ केला जाईल. केवळ यावर्षी‎ त्यामध्ये पदाधिकाऱ्यांचा अंतर्भाव‎ नसेल. परंतु नेहमीच्या‎ प्रक्रियेनुसार सर्व‎ विभागप्रमुखांकडून त्यांची मागणी‎ नोंदवून घेत सर्वसमावेशक‎ अर्थसंकल्प तयार केला जात‎ आहे. आगामी २० ते २२‎ मार्चदरम्यान तो मुख्य कार्यकारी‎ अधिकारी यांच्या उपस्थितीत‎ अंतिम केला जाईल.‎ - चंद्रशेखर खंडारे, मुख्य वित्त व‎ लेखाधिकारी, जि.प. अमरावती.‎

बातम्या आणखी आहेत...