आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामानाची वर्गवारी:रेल्वेत जास्त सामान घेऊन जाणे पडणार महागात ; सहापट दंडाचीही केली तरतूद

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेत प्रवास करताना आवश्यकतेपेक्षा जास्त वजन नेण्याची प्रवाशांना सवय जडली आहे. अनेकजण तर धान्याचे पोते, भांडे, फळाच्या पेट्या, सामानाच्या मोठ्या बॅग असे जड सामान घेऊन प्रवास करतात. मात्र, आता रेल्वेने कोणत्या श्रेणीत प्रवाशाला किती वजनी सामान नेता येईल, याबाबत मर्यादा निश्चित केली असून त्यापेक्षा जास्त सामान नेल्यास सहा पट जास्त दंड आकारला जाणार आहे. यामुळे मोजके सामना घेऊन प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

प्रथम श्रेणी एसीत ७० किलो, द्वितीय श्रेणी एसीत ५० किलो आणि स्लीपर कोचमध्ये एका प्रवाशाला ४० किलोपर्यंत सामान नेता येईल. तिकिट तपासणीसाकडे हॅण्डी वजनकाटा राहणार असून त्यांना जर जास्त वजन असल्याचा संशय आला तर ते वजन करतील. वजन जास्त भरल्यास प्रवाशांकडून दंड वसूल केला जाईल, अशी माहिती रेल्वे विभागाद्वारे देण्यात आली. एक प्रवासी ४० किलो वजनाच्या सामानासह ५०० कि.मी.पेक्षा जास्त प्रवास करीत असल्यास त्याला १०९ रु. सामानाचे शुल्क भरावे लागेल. मात्र, त्याने शुल्क न भरता प्रवास केला तर त्याला सहापट जास्त दंड द्यावा लागेल.

रेल्वेत जास्त सामान न्यायाचे असल्यास प्रवासाच्या आधी तिकीट खिडकीवर शुल्क भरावे लागेल. यामुळे घरून निघण्याआधीच आपल्या सामानाचे वजन करणे योग्य ठरेल.

बातम्या आणखी आहेत...