आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलूपबंद:हिरकणीवर उघड्या जागी स्तनपानदेण्याची आली वेळ; कक्ष कुलूपबंद

जयश्री देशमुख | अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणांसह शासकीय कार्यालयातील हिरकणी कक्ष हे निव्वळ शोभेची वस्तू बनून राहिले आहेत. कारण ते सदैव कुलूपबंदच असतात. चावी नेमकी कोणाकडे याबाबतही वारंवार विचारणा केल्यानंतर सहज माहिती मिळत नाही. कहर म्हणजे काही ठिकाणी तर चाव्याच हरवल्या आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जिल्हा परिषद हे मुख्यालयाचे ठिकाण असताना येथे हिरकणी कक्षच नाही.

त्यामुळे तान्हुल्या बाळांना सोबत घेऊन येणाऱ्या मातांपुढे त्याला स्तनपान कसे करावी, असा गहन प्रश्न निर्माण होतो. नाईलाजाने त्यांना कुचंबणा सहन करत उघड्यावर स्तनपान करावे लागत असल्याचे वास्तव ‘दिव्य मराठी’ला प्रत्यक्ष पाहणीदरम्यान दिसून आले. चावी नेमकी कोणाकडे याबाबत नाव आणि मोबाइल क्रमांकासह साधा फलक

मॉडेल रेल्वे स्थानक
अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अमरावती मॉडेल रेल्वेस्थानकावरही हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, तो विचित्र पद्धतीने उभा करून ठेवला आहे. त्याचे दार खडकीजवळ असल्याचे कुलूप उघडायचे कसे व आतमध्ये जायचे कसे, असा प्रश्न या हिरकणी कक्षाकडे पाहून पडतो.

राजापेठ बसस्थानक
जवळपास पाच वर्षांपूर्वी शहरात राजापेठ येथे नवीन बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली. बसस्थानकात प्रवेश करताच समोर स्टिल मटेरियलचा अन्य हिरकणी कक्षांच्या तुलनेत मोठा कक्ष दृष्टीस पडतो. परंतु, त्याला झुडूप व कचऱ्याचा विळखा पडला आहे.

मध्यवर्ती बसस्थानक
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात उपहारगृहाला लागून हा हिरकणी कक्ष आहे. मात्र त्याच्यासमोरच एक मोठी लोखंडी ट्रॉली उभी करून ठेवली आहे. जणू या हिरकणी कक्षाचा वापर होणारच नाही, असे गृहीत धरण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...