आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स्प्रेस:जबलपूर एक्स्प्रेस 8 पासून धावणार; वेळेत झाला बदल

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे अडीच वर्षे बंद राहिलेली जबलपूर एक्स्प्रेस पुन्हा अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावरून धावणार आहे. शनिवार ८ रोजी सायंकाळी ४.४५ वाजता ही गाडी सुटणार असल्याची माहिती रेल्वे स्थानक प्रबंधकांनी दिली. तत्पूर्वी सकाळी १० वाजता या गाडीचे जबलपूर येथून अमरावती स्थानकावर आगमन होईल. यापूर्वी जबलपूर एक्सप्रेस सायंकाळी ५.४५ वाजता सुटायची. आता तिची वेळ ही एक तास आधी करण्यात आली असून, ती ४.४५ वाजता सुटेल. त्यामुळे अमरावतीकर चाकरमाने, विद्यार्थी, व्यापारी व प्रवाशांना नागपूरसह जबलपूरला जाण्यासाठी सोयिस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.

खा. नवनीत रवी राणा, खा. रामदास तडस व माजी राज्यमंत्री डाॅ. सुनील देशमुख यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जबलपूर एक्सप्रेस पुन्हा अमरावतीतून धावणार आहे. शनिवारी दुपारी ४.४५ वाजता खा. राणा व राज्यसभा खा. डॉ अनिल बोंडे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.

बातम्या आणखी आहेत...