आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेंदुरजनाघाट नगर परिषद
शेंदुरजनाघाट | येथील नगर परिषदेत महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्याधिकारी तथा प्रशासक रवींद्र पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी कर व प्रशासकीय अधिकारी अमोल ढोले, आरोग्य निरीक्षक रणजित सोनेकर, मिळकत व्यवस्थापक नरेंद्र वासनिक, संगणक अभियंता अमेय वानखडे, नगररचना अधिकारी समाधान काटे, लेखा परीक्षक प्राजक्ता मेश्राम, निता हमाने, प्रीतम सोनटक्के, प्रकाश खोब्रागडे, विक्रम रेवतकर, विक्रम खोडके, रामभाऊ कुरवाडे, दीपक दंवडे, मंगेश होले, कुणाल आठवले, कार्तिक होले, निसार भाई, महेश पोटे, गुलाब चक्रपाणी आदींसह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेंदुरजनाघाट प्राथमिक आरोग्य केंद्र
शेदुरजनाघाट | शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. या वेळी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण करून डॉ. भास्कर शेबेंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन कुऱ्हाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण बोबडे, डॉ. भास्कर शेंबेकर, अनंत राऊत, सुहास खरपकर, दीपाली तोटे, कल्पना वहेकर, अमोल पतोड, निखिल दरवई, सचिन नांदुरकर, रनदीप दवंडे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पी. आर. पोटे इंटरनॅशनल स्कूल
अमरावती | पी. आर. पोटे इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्र दिनी प्राचार्य सचिन दुर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी उपप्राचार्य सोनल निस्ताने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची किनाके यांनी केले. या प्रसंगी गर्जा महाराष्ट्र माझा, असा जयघोष करण्यात आला.
श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय
अमरावती | स्थानिक श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिवस महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन हारार्पण व दीपप्रज्वलन करून ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व प्रास्ताविक प्रा. डॉ. पी. एस. सायर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिव इंग्लिश स्कूलमध्ये ध्वजारोहण
अमरावती | शहरातील शिव इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थाध्यक्ष अनिल तरडेजा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका सोनाली काशीकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.