आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:पत्नीला सासरी पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने केली सासूची हत्या; पोलिसांनी घेतले जावयाला ताब्यात

शेंदुरजनाघाट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीला सासरी पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने लाकडी काठीने मारहाण करीत हत्या केली. ही घटना शनिवारी रात्री दीडच्या सुमारास शहरातील मलकापूर येथील प्रभाग क्रमांक ८ मध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी जावाई जीवनू रिमकलाल धूर्वे (३८) रा. चारनेटी दगडीया, ता. मोक्कड, जि. छिंदवाडा ( म.प्र ) याला ताब्यात घेतले आहे. चंद्रकला संतलाल तूमडाम (६०) रा. मलकापूर पुनर्वसन, शेंदुरजनाघाट असे मृतक सासूचे नाव आहे.

मृत चंद्रकला तुमडाम यांच्या मुलीचे आरोपीसोबत लग्न झाले असून, मागील वर्षभरापासून ती काही कारणास्तव माहेरी येऊन राहत होती. पत्नीला सासू नांदायला सासरी पाठवत नाही, हा राग आरोपीच्या मनात होता. त्यातून जावायाने घटनेच्या वेळी सासरी येऊन दारूच्या नशेत पत्नीसोबत वाद घातला. मृतक महिला ही या वादामध्ये मध्यस्ती करण्यासाठी आली असता, रागाच्या भरात त्याने तिच्या डोक्यावर लाकडी काठीने वार केला. त्यात तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर मात्र त्याने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी सुनील संतलाला तूमडाम (३०, रा. मलकापूर, शेंदुरजनाघाट) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. शेेंदुरजनाघाट पोलिसांनी त्याचा शोध घेत पहाटे त्याला तिवसाघाट येथून ताब्यात घेतले. घटनेचा पंचनामा करीत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

बातम्या आणखी आहेत...