आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27 वर्षानंतर भाकपचे 18 ते 20 सप्टेंबरदरम्यान अमरावतीत अधिवेशन:अधिवेशनात डाव्यांच्या एकजुटीवरही होणार चर्चा

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 24 वे राज्य अधिवेशन आगामी 18 ते 20 सप्टेंबरदरम्यान अमरावती शहरात होत आहे. 27 वर्षानंतर हे अधिवेशन अमरावतीत होत असून यात डाव्यांच्या एकजुटीवरही चर्चा होणार आहे.

लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक केमिस्ट भवन येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात हे विमोचन पार पडले. भाकपचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला कामगार नेते तथा आयटकचे राज्यअध्यक्ष कॉ. सी.एन. देशमुख, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी डॉ. अश्विन चौधरी व प्रा. प्रफुल्ल गुडधे, राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचे नेते तथा जिल्हा सरचिटणीस डी.एस. पवार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्हयातील भाकपचे सदस्य व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

अमरावतीत 27 वर्षानंतर अधिवेशन

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन दुसऱ्यांदा अमरावती जिल्ह्यात होत आहे. 27 वर्षांपूर्वी बडनेरा रोड स्थित महेश भवनात तीन दिवसीय अधिवेशन पार पडले होते. त्यावेळी भाकपचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड अर्धेन्दूभूषण बर्धन तर राज्य सरचिटणीस कॉम्रेड अ‌ॅड. गोविंद पानसरे होते. यावेळी राज्य सरचिटणीस कॉम्रेड तुकाराम भस्मे हे अमरावती जिल्ह्याचे निवासी असून सदर अधिवेशन हे एलआयसी कार्यालयाच्या शेजारील नेमाणी इनमध्ये होणार आहे.

डाव्यांच्या एकजुटीवरही होणार चर्चा

अधिवेशनात राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा सर्वच मुद्द्यांवर चर्चा केली जाणार असून डाव्यांची एकजूट हा त्यातील महत्वाचा मुद्दा आहे. भाकपने 1989 च्या कोलकाता अधिवेशनातही राष्ट्रीय पातळीवर डाव्या पक्षांच्या एकजुटीचा ठराव मान्य केला होता. पक्ष त्या भूमिकेवर अजूनही कायम आहे. त्यामुळे भाकपसोबत इतर पक्षांनीही या विषयावर खुलेपणाने चर्चा घडवून काळाची गरज लक्षात घेत एकत्र येत सर्वांची एकजूट करावी, असे आवाहन भाकपने केले आहे.

अधिवेशनानिमित्त या शहराचे ऐतिहासिकत्व दर्शविणाऱ्या जवाहर व्दारचे कोंदण असलेला लोगो तयार करण्यात आला असून आज, सोमवारी या लोगाचे विमोचन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...