आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णाभाऊ साठे जयंती:भाकपच्या राज्य अधिवेशनाला जवाहरद्वारचे कोंदण

अमरावती16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे २४ वे राज्य अधिवेशन १८ ते २० सप्टेंबरदरम्यान अमरावती शहरात होत आहे. त्यानिमित्ताने या शहराचे ऐतिहासिकत्व दर्शवणाऱ्या जवाहर द्वारचे कोंदण असलेला लोगो तयार करण्यात आला असून, सोमवारी या लाेगाेचे विमोचन करण्यात आले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक केमिस्ट भवन येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात हे विमोचन पार पडले. भाकपचे राज्य सचिव तुकाराम भस्मे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला कामगार नेते तथा आयटकचे राज्याध्यक्ष सी. एन. देशमुख, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी डॉ. आश्विन चौधरी व प्रा. प्रफुल्ल गुडधे, राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचे नेते तथा जिल्हा सरचिटणीस डी. एस. पवार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाकपचे सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...