आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय:नितीन गडकरींच्या भेटीला दुसरा कंगोरा नाही : जयंत पाटील

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली येथील भेटीत केंद्राकडे निधीअभावी रखडलेल्या जलसिंचन प्रकल्पांबाबत चर्चा झाली. या भेटीला इतर कोणतेही कंगोरे नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील यांनी अलीकडेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली होती. भेटीपूर्वी काही दिवस अगोदर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न असल्याचे वक्तव्य इचलकरंजी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले होते. ‘दिव्य मराठी’ ने दि.४ रोजीच्या अंकात राज्यात मुदतपूर्व निवडणुकीच्या हालचाली हे वृत्त प्रकाशित केले होते. या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

अमरावती जिल्ह्यातील संवाद यात्रेनिमित्त गुरुवारी दुपारी जयंत पाटील यांनी वऱ्हाडे मंगल कार्यालयात दर्यापूर व धामणगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. माझा दौरा हा राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा असा असला तरी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पुढाऱ्यांशीही माझ्या भेटी झाल्या आहेत, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...