आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रकला:नियोजन फिस्कटल्याने जेसीआयच्या चित्रकला स्पर्धेत उडाला गोंधळ

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पर्धा आयोजनासंदर्भातील नियोजन फिस्कटल्याने ४ ते १५ वयोगटासाठी जेसीआयद्वारे रविवारी दुपारी २ वाजता आयोजित चित्रकला स्पर्धेत गोंधळ उडाला. खुल्या स्टेडियममध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत सुमारे २५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना उघड्यावर उन्हात बसवणे शक्य नसल्याने पालकांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे ऐनवेळी स्पर्धा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील तीन इनडोअर स्टेडियमसह अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थानांतरित केली. चिमुकल्या बालकांना घेऊन नेमके कुठे जायचे याबाबत पालकांना माहिती नसल्याने जिम्नॅस्टिक्स हाॅलपुढे गर्दी झाली. तेथून त्यांना इकडे जा, तिकडे जा असे आयोजकांनी सांगितल्याने पालकांचा संताप अनावर झाला. त्यांनी स्पर्धा आयोजकांच्या नावाने बोटे मोडली.

प्रत्येक स्टेडियम विद्यार्थ्यांनी खचाखच भरले होते. या स्पर्धेत शहरातील २२ शाळांचे सुमारे २५०० विद्यार्थी सहभागी झाले. इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड आणि आशिया बुक आॅफ रेकाॅर्ड व इंटरनॅशनल बुक आॅफ रेकाॅर्डमध्ये या विक्रमाची नोंद होणार होती. परंतु, एकाच ठिकाणी विद्यार्थी नसल्याने नेमकी रेकाॅर्डमध्ये नोंद कशी घेणार असा प्रश्न आहे.एचव्हीपीएममध्ये ही स्पर्धा असल्यामुळे ऐनवेळी इनडोअर स्टेडियमची सोय झाली. स्वयंसेवकांसह प्राध्यापकांनीही धावाधाव करून विद्यार्थ्यांना स्टेडियम उपलब्ध करून दिले. अन्यथा आणखी चांगलीच फजिती झाली असती. सुरक्षित स्पर्धा घेणार असे आयोजकांनी सांगितले होते. परंतु, पालकांसह विद्यार्थ्यांची धावाधाव बघून सुरक्षेची हवा निघाल्याचे दिसून आले.

गांधी चौक ते भुतेश्वर चौक वाहतुकीची कोंडी : स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन पालक मोठ्या संख्येत दुचाकी, चारचाकी वाहनांनी दुपारी १ ते २ च्या सुमारास आल्यामुळे गांधी चौक

बातम्या आणखी आहेत...