आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावतीकर यष्टीरक्षक फलंदाज तसेच किंग्स इलेव्हन पंजाबचा हुकमी खेळाडू जितेश शर्माची भारतीय टी - 20 संघात निवड झाल्यामुळे अमरावतीकर क्रिकेटपटूंमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
चपळ यष्टीरक्षक काळे मोठे फटके हाणण्यात तरबेज असलेल्या जितेशला भारतीय संघात संधी मिळाल्यामुळे अमरावती येथील त्याचे क्रिकेट प्रशिक्षक डॉ. दीनानाथ नावाथे यांनी आपल्या परिश्रमाचे सार्थक झाल्याची भावना व्यक्त केली.
वयाच्या 14 वर्षापासून जितेशने नावाथे यांच्याकडे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रिकेट स्टेडियमवर प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे त्याने सोळा वर्षाखालील विदर्भ संघात स्थान मिळवले. त्यानंतर मागे वळून बघितले नाही. सतत संघासाठी उपयोगी कामगिरी केल्यामुळे त्याचा 19 वर्षाखालील आणि नंतर वरिष्ठ विदर्भ क्रिकेट संघात समावेश करण्यात आला. दरम्यान आक्रमक फलंदाजी मैत्रिणी विदर्भाला काही सामने जिंकून दिले. त्याची कामगिरी बघून मुंबई इंडियन्स आयपीएल संघाने त्याची निवड केली. परंतु प्रत्यक्ष खेळण्याची त्याला संधी मिळाली नाही.
गुडघ्याच्या दुखापतीमुळे जखमी संजू सॅमसनच्या जागी जितेशला संधी देण्यात आली. सध्या श्रीलंके विरुद्ध सुरू असलेल्या तसेच आज पुणे येथे होणाऱ्या दुसऱ्या टी - 20 सामन्यापासून जितेश भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करण्याची शक्यता आहे.
चपळ यष्टीरक्षक काळे मोठे फटके हाणण्यात तरबेज असलेल्या जितेशला भारतीय संघात संधी मिळाल्यामुळे अमरावती येथील त्याचे क्रिकेट प्रशिक्षक डॉ. दीनानाथ नावाथे यांनी आपल्या परिश्रमाचे सार्थक झाल्याची भावना व्यक्त केली. वयाच्या 14 वर्षापासून जितेशने नावाथे यांच्याकडे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रिकेट स्टेडियमवर प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे त्याने सोळा वर्षाखालील विदर्भ संघात स्थान मिळवले. त्यानंतर मागे वळून बघितले नाही. सतत संघासाठी उपयोगी कामगिरी केल्यामुळे त्याचा 19 वर्षाखालील आणि नंतर वरिष्ठ विदर्भ क्रिकेट संघात समावेश करण्यात आला. दरम्यान आक्रमक फलंदाजी मैत्रिणी विदर्भाला काही सामने जिंकून दिले. त्याची कामगिरी बघून मुंबई इंडियन्स आयपीएल संघाने त्याची निवड केली. परंतु प्रत्यक्ष खेळण्याची त्याला संधी मिळाली नाही.
2022 मध्ये त्याचे भाग्य फळफळले. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला खरेदी केले व खेळण्याची संधी दिली. उत्कृष्ट कामगिरीद्वारे जितेशने आयपीएलही गाजवले. आता तो भारतीय टी - 20 संघात कारकीर्द घडविण्यात सज्ज झाला आहे. जितेशला भारतीय संघाकडून खेळताना बघणे ही अमरावती करण्यासाठी अभिमानास्पद बाब असेल, अशा प्रतिक्रिया शहरातील क्रीडा प्रेमींमध्ये उमटत आहेत.
श्री हनुमान प्रसारक मंडळाचे सचिव व अमरावती जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष एडवोकेट प्रशांत देशपांडे, सचिव व प्रशिक्षक प्रा. डॉ. दिनानाथ नवाथे, अल्हाद लोखंडे, मंडळाचे, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव डॉ. माधुरी चेंडके, अमरावती जिल्हा क्रिकेट संघटनेचे सर्व पदाधिकारी ,सर्व खेळाडू यांनी त्याचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या त्याच्या या निवडीबद्दल अमरावती करांमध्ये आनंद व उत्साह निर्माण झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.