आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखणी‎:पत्रकारांनी आपली लेखणी‎ सतत तळपत ठेवावी : थोरहाते‎

हिवराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आश्रम‎ पत्रकार हा समाजातील महत्त्वपूर्ण‎ घटक आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न‎ व समस्या तो आपल्या लेखणीद्वारे‎ मांडत असतो. तसेच शासनाच्या‎ विविध योजना समाजापर्यंत‎ पोहोचवत असतो. सर्वसामान्यांना‎ न्याय देताना पत्रकारांनी आपली‎ लेखणी सतत तळपत ठेवावी,‎ असे प्रतिपादन विवेकानंद‎ आश्रमाचे सहसचिव आत्मानंद‎ थोरहाते यांनी केले.‎

विवेकानंद आश्रमाच्या वतीने‎ आज, दि. ६ जानेवारी रोजी‎ पत्रकार दिनानिमित्त आयोजित‎ कार्यक्रमात थोरहाते बोलत होते.‎ विवेकानंद आश्रमाचे सचिव‎ संतोष गोरे यांनी यावेळी विधायक‎ पत्रकारितेचे महत्त्व सांगताना‎ पत्रकारांसमोरील अडचणींचा‎ लेखाजोखा सादर केला.‎ कार्यक्रमात आश्रमाच्या वतीने‎ पत्रकारांचा सत्कार करण्यात‎ आला. यावेळी पत्रकार मधू‎ आढाव, समाधान म्हस्के,‎ शिवप्रसाद थुट्टे, सदाशिव काळे व‎ गंगाधर निकस यांच्यासह अनेक‎ मान्यवर व आश्रमातील कर्मचारी‎ यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...