आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:समृद्धीच्या लोकार्पण सोहळ्याचा धामणगावात नागरिकांतर्फे जल्लोष

धामणगाव रेल्वे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भाच्या अर्थकारणाला बळकटी देणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याचे धामणगावात रविवारी (दि. ११) ढोल ताश्याच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान या वेळी आमदार प्रताप अडसड यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी १० किमी. मोटरसायकल रॅली काढली. नागपूर- शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

याचे थेट प्रक्षेपण जिल्ह्यातील जनतेला पाहता यावे यासाठी आ. अडसड यांनी समृद्धी महामार्गालगत तालुक्यातील आसेगाव-सावळा फाटा नजीक एका एकरात मंडप उभारून डिजिटल स्क्रीनवर लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून माजी आमदार अरुण अडसड, खासदार डॉ. अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे, आ. प्रताप अडसड, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी( दिघडे), माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, शिवराय कुलकर्णी, रमेश मावसकर, दिनेश सूर्यवंशी, तुषार भारतीय, चेतन गावंडे, प्रशांत शेगोकार, सुरेखा शिंदे, रवींद्र मुंदे यांची उपस्थिती होती.

ढोल ताशाच्या गजरात लोकप्रतिनिधींचा आनंद
महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणाऱ्या या समृद्धी महामार्गाचा सोहळा नागपुरात सुरू होण्यापुर्वी ढोल ताशाच्या गजरात आमदार खासदारांनी नृत्य केले. आ. अडसड यांच्यामुळे या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता येत असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना डोक्यावर घेतले होते.

१० किलोमीटरची मोटारसायकल रॅली
समृद्धी महामार्गाचे लोकार्पणानिमित्त भाजप द्वारे जुना धामणगाव येथून आ. अडसड यांच्या उपस्थितीत मोटर सायकल रॅली काढली. गावागावातील कार्यकर्त्यांनी दुचाकी घेऊन या रॅलीत सहभाग नोंदवला. ही रॅली शहरातून मार्गक्रमण करीत थेट प्रक्षेपण स्थळी पोहचली.

समृद्धी’च्या ७३ किलोमीटरवर सजावट
समृद्धीचा इंटर चेंज मार्गापासून आसेगाव-शिवणी टोल नाक्यापर्यंत सजावटीसह भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे झेंडे फडकवण्यात आले होते. प्रत्येक फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आभाराचे फलक आ. अडसड यांच्या वतीने लावण्यात आले होते

बातम्या आणखी आहेत...