आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधवा कुप्रथा:कसबेगव्हाण ग्रा. पं.ने केला विधवा कुप्रथा बंदीचा ठराव ; सामाजिक परिवर्तनासाठी कृतिशील संदेश

अंजनगाव सुर्जीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाजात प्रचलित असलेले अनिष्ट विधवा प्रथेचे गावातून उच्चाटन करण्याचा ठराव तालुक्यातील कसबेगव्हाण येथील ग्रामसभेत नागरिकांनी एकमताने संमत केला. राज्यातील हेरवाड पाठोपाठ अमरावती जिल्ह्यातील कसबेगव्हाण ग्रामपंचायतही विधवा प्रथा बंद करणारी प्रथम ग्रामपंचायत ठरली आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाला ग्रामस्थांनी एकमताने मंजुरी देत एक आदर्श निर्माण केला आहे. कसबेगव्हाण ग्रामपंचायत येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच शशिकांत मंगळे होते. प्रथम ग्रामविकास अधिकारी नरेश भरसाकळे यांनी स्वागत व प्रास्ताविक करत मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. गावातली विधवा प्रथा बंद व्हावी, यासाठी लीला डिके यांनी ग्रामसभेपुढे प्रस्ताव मांडला. त्याला सरपंच मंगळे यांनी अनुमती देत विधवांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून ऐतिहासिक निर्णय घेत ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीत कसबेगव्हाण नेहमी अग्रेसर राहील, असा कृतिशील संदेश ग्रामसभेने दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हेरवाड पाठोपाठ कसबेगव्हाणमध्येही विधवा प्रथा बंद करण्यात आली आहे. विधवा प्रथेमुळे पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र काढणे, हातातील बांगड्या फोडणे व पायातील जोडवे काढणे असे अमंगल कृत्य विधवा महिलेच्या बाबतीत केले जाते तसेच तिला कोणत्याही धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात डावलले जाते. विधवा महिलांना इतर सर्वसामान्य महिलांप्रमाणे जीवन जगता यावे म्हणून विधवा प्रथा बंद करण्यात यावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. या वेळी उपसरपंच अमोल घुरडे, ग्रा. पं. सदस्य राधिका हिवराळे, शागिराबी अता मोहम्मद, शारदा दामले, प्रशांत दामले, रेखा हंबर्डे, वृषाली चित्रकार, सुधाकर शिंगणे, मो. वासिक शे. महेमुद, पद्मा मोरे, विजया ठाकरे व वैभव झटाले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान विधवा प्रथेमुळे पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र काढणे, हातातील बांगड्या फोडणे व पायातील जोडवे काढणे असे अमंगल कृत्य विधवा महिलेच्या बाबतीत केले जाते. तसेच विधवा महिलेला कोणत्याही धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात डावलले जाते. मात्र विधवा प्रथा बंदचा ठराव मंजूर झाल्याने कसबेगव्हाणवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयाचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...