आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाद्वारे आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या मैदानावर उतरण्याच्या आदल्या दिवशीच पितृछत्र हरवले. मात्र आई व आजीच्या मदतीने दु:खाला बाजुला सारत शाळेसाठी ती मैदानात उतरली आणि कबड्डी संघाचे कर्णधारपद भुषवत शाळेला मुलींच्या कबड्डी संघाचे उपविजेते पद मिळवून दिले.
शाळेसाठी पितृ निधनाचे दु:ख बाजूला ठेवून मैदानात उतरणाऱ्या या रणरागिनीचे नाव आहे. कल्याणी शिंदे. ती तालुक्यातील निमगव्हाण येथील जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळेची विद्यार्थीनी आहे. कल्याणी ही शाळेच्या कबड्डी चमूची कर्णधार असून कबड्डीमध्ये उत्तम रेडर म्हणून परिचित आहे. अमरावती येथील जिल्हा क्रीडा संकुलात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवसीय जिल्हा शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या कबड्डी संघाचे नेतृत्व करीत मैदानात उतरण्यापुर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले. दुसऱ्या दिवशी स्पर्धा असताना आता कसे करायचे या कात्रीत ती सापडली. मात्र आई व आजीच्या मदतीने तिने आपल्या दु:खाला बाजूला सारत आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. खंबीरपणे तिने संघाचे नेतृत्व करीत शाळेला उपविजेता पद मिळवून दिले. सलग तीन सामने जिंकून अंतिम फेरीत पोचली.
वडिलांची इच्छा केली पूर्ण वडिलांचे निधन झाल्याने कल्याणी मैदानात उतरणार नाही, मैत्रिणी व शिक्षकांना वाटत होते, परंतु रात्री तिने आपण उद्या खेळायला येणार असल्याचे शिक्षकांना कळवले. वडील आजारी असतांना त्यांनी शाळेत येऊन कल्याणीच्या स्पर्धेविषयी शिक्षकांशी चर्चा केली होती आणि कल्याणी नक्कीच शाळेसाठी बक्षीस आणणार, असे शिक्षकांना सांगीतले. वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी कल्याणीच्या आई आणि आजीने तिला खेळायला जाण्याकरिता परवानगी दिली अन् कल्याणी दुसऱ्या दिवशी मैदानात उतरली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.