आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:खार पोलिसांनी बजावली राणा दाम्पत्याला नोटीस ; बुधवारी वांद्रे (पूर्व) कोर्टात हजर होण्याचे आदेश

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमान चालिसा प्रकरणी खार पोलिसांनी खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांना दोषारोपपत्र दाखल करण्याच्या कारवाईसाठी बुधवार,दि. ८ रोजी मुंबई येथील वांद्रे (पूर्व) न्यायालयात हजर होण्याची नोटीस पाठवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पाठ करण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला. राणा दाम्पत्याच्या विरोधात कलम ३५३ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून दोषारोपपत्र अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, ९ वे न्यायालय, वांद्रे (पू.) यांच्या न्यायालयात दाखल केले जाणार आहे. या गुन्ह्यात आपण आरोपी असल्यामुळे ८ रोजी दुपारी ११ वाजता न्यायालयात न चुकता हजर राहावे, असे तपास अधिकारी व पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप येडे, खार पोलिस ठाणे, मुंबई यांनी पाठवलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...