आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान चालीसा प्रकरण:राणा दाम्पत्याला खार पोलिसांची नोटीस; बुधवारी मुंबईतील वांद्रे न्यायालयात हजर होण्याचे आदेश

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमान चालीसा प्रकरणी खार पोलिसांनी खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांना दोषारोपपत्र दाखल करण्याच्या कारवाईसाठी बुधवार 8 रोजी मुंबई येथील वांद्रे (पूर्व) न्यायालयात हजर होण्याची नोटीस पाठविली आहे.

मुंख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पाठ करण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला. राणा दाम्पत्याच्या विरोधात कलम 353 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून दोषाराेपपत्र अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, 9 वे न्यायालय, वांद्रे (पू.) यांच्या न्यायालयात दाखल केले जाणार आहे. या गुन्ह्यात आपण आरोपी असल्यामुळे 8 रोजी सकाळी. 11 वाजता न्यायालयात न चुकता हजर राहावे, असे तपास अधिकारी व पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप येडे, खार पोलिस ठाणे, मुंबई यांनी पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसा पाठ करावा, अशी मागणी करण्यासाठी राणा दाम्पत्य 23 एप्रिल रोजी अमरावतीहून मुंबई येथे पोहोचले. त्यानंतर 24 रोजी ते मातोश्रीकडे निघण्याच्या आधीच त्यांना खार भागातील त्यांच्या फ्लॅटमधून पोलिसांनी अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...