आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Kidnapping Of Minor Girl At Knifepoint In Amravati Kidnapper Killed By Unknown; There Was A Thrill Of Murder Along With Kidnapping In The Middle Of The Night

अमरावतीत चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलीचे अपहरण:अज्ञाताकडून अपहरण करणाऱ्याची हत्या; मध्यरात्री घडला थरार

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील चांदुर रेल्वे शहरात राहणाऱ्या एका पंधरा ते सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे घरात जाऊन चाकूच्या धाकावर दोन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आले होते. पोलिसांकडून अपहत मुलीसह आरोपीचा शोध सुरू होता. दरम्यान शुक्रवारी (दि. 23) पहाटे अडीच ते तीन वाजताच्या सुमारास आरोपी मुलीला घेऊन चांदूररेल्वेत पोहोचला. त्यावेळी अज्ञात मारेकऱ्यांनी अपहरणकर्त्यावर हल्ला चढवला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. अपहरणकर्त्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

घटना नेमकी काय?

नईम खान रहमान खान (38, रा. चांदुर रेल्वे) असे मृतकाचे नाव आहे. नईम खानने चांदूर रेल्वे येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश करून 21 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास त्या मुलीचे अपहरण केले होते. यावेळी त्याच्यासोबत अन्य दोन सहकारी सुद्धा हजर होते. मुलीला घेऊन त्याने एका तवेरा वाहनातून पळ काढला होता. अपहरनानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली. चांदुर रेल्वे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. मात्र गुरुवारी उशिरारात्रीपर्यंत पोलिसांना तो किंवा अपहत मुलगी सापडली नाही. दरम्यान शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास एका दुचाकीवर नईम त्याच्या दोन मित्रांसह मुलगी असे चौघे एकाच दुचाकीने अमरावतीवरून चांदूर रेल्वे येथे पोहोचला.

मुलीली वापस सोडताच हल्ला

मुलीला तिच्या घराच्या परिसरात सोडल्यानंतर नईम खानवर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला चढवला. यामध्ये मारेकऱ्यांनी त्याच्यावर चाकूचे घावसुद्धा केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. ही माहिती मिळाल्यानंतर चांदूर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आहे. नईमचे मारेकरी अजून सापडले नाही. दरम्यान त्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले म्हणून त्याचा खून झाला किंवा अन्य काही कारणाने त्याचा बदला घेण्यात आला. याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहे.

खूनासह 12 गुन्हे दाखल

चांदूर रेल्वे ठाण्याचे ठाणेदार विलास कुलकर्णी​​​​​​​ म्हणाले की, मृतक नइम खान याच्याविरुद्ध खून करणे यासह इतर बारा गुन्ह्याची नोंद आहे. अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. आम्ही मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...