आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच जणांवर कारवाई:कुऱ्हा पोलिसांची मार्डी येथे गावठी दारू अड्ड्यावर धाड ; 45 हजाराचे साहित्य नष्ट

कुऱ्हाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुऱ्हा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मार्डी व दिवानखेड येथे पोलिसांनी धाडसत्र राबवून गावठी दारू, दारु तयार करण्यासाठीची भट्टी, मोहाचा सडवा, दारू काढण्याचे साहित्य नष्ट केले. नष्ट केलेले हे साहित्य सुमारे ४५ हजार रुपयांचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांवर कारवाई केली आहे.

अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच चांदूर रेल्वे उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कु-हा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप बिरांजे, एपीआय राऊत, पीएसआय सुभाष अढाऊ, जमादार अनिल निंघोट, नितीन गेडाम, रवींद्र भुताडे, सतीश ठवकर, सागर निमकर, भूषण आगरकर, हवालदार किरण दारव्हेकर, योगेश नेवारे, आदींनी ही कारवाई पूर्णत्वास नेली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर कारवाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...