आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने लंपास:‘हळदी’ कार्यक्रमातून सोन्याचे दागिने लंपास ; राजापेठ पोलिसांत तक्रार

अमरावती18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हळदीच्या कार्यक्रमात आलेल्या एका महिलेची सोन्याचे दागिने असलेली बॅग चोराने लंपास केले. या प्रकरणी सुहास बलवंत मनोहर (४०, रा. गगलानीनगर) यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार दिली. मनोहर हे हळदीच्या कार्यक्रमासाठी मालती सेलिब्रेशन येथे गेले होते. याच ठिकाणाहून त्यांच्या एका नातेवाइकाचे ७७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली हँडबॅग चोराने लंपास केली. या घटनेची तक्रार १२ जून रोजी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...