आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या दराने आकारणी:वयोमर्यादा संपलेल्या वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्कात मोठी वाढ; बस आणि ट्रकसाठी सर्वाधिक 17.5 पट वाढ

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक वाहनाची वयोमर्यादा निश्चित केली असून ती सरासरी पंधरा वर्ष ठरली आहे. यापूर्वी वयोमर्यादा संपलेल्या वाहनांची फिटनेस (योग्यता) चाचणी करुन ती वाहने पुनर्नोंदणी करण्यासाठी जे शुल्क आकारले जायचे, त्या शुल्कात शुक्रवारपासून (दि. १) चांगलीच वाढ झाली आहे.

ही शुल्क वाढ ३.२५ ते १७.५ पट झालेली आहे. या शुल्कवाढीचा वाहन मालकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. यामध्ये सर्वाधिक १७.५ पट शुल्क वाढ (ट्रान्सपोर्ट) ट्रक व बसमध्ये झालेली आहे. केंद्र सरकारने ४ ऑक्टोबर २०२१ ला या शुल्कवाढीसंदर्भात परिपत्रक काढले होते. वाढीव शुल्क हे १ एप्रिल २०२२ पासून लागू करण्याबाबतचे त्याच परिपत्रकात नमूद करण्यात आले होते.

त्यामुळेच अमरावती आरटीओतही वाढीव शुल्क आकारले जाण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये पंधरा वर्षाची वयोमर्यादा संपलेल्या वाहनांचे फिटनेस (योग्यता) व रजिस्ट्रेशन (पुनर्नोंदणी) या शिर्षामध्ये वाढ झाली आहे. वयोमर्यादा संपलेल्या वाहनांचे फिटनेस झाल्याशिवाय रजिस्ट्रेशन होवू शकत नाही. त्यामुळे वाढीव शुल्काचा आणि जुन्या शुल्काचा विचार केल्यास झालेली शुल्कवाढ ही ३ पटीपासून ते १७.५ पटीपर्यंत झालेली आहे.

बातम्या आणखी आहेत...