आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसळलेली‎ भाविकांची गर्दी‎:संत लहानुजी महाराजांना शेवटचा निरोप‎

दर्यापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गण-गण गणात बोते,‎ हरिनामाचा जयघोष व संत लहानुजी‎ महाराज की जय, चा गजर करून श्री संत‎ लहानुजी महाराज (राजेंद्र अजाबराव‎ चापके) यांना हजारो भाविकांनी भावपूर्ण‎ अश्रूनयनांनी मंगळवारी शेवटचा निरोप‎ दिला. मंदिरा मागील संस्थेच्या‎ शेतशिवारात श्री. संत लहानुजी‎ महाराजांना समाधी देण्यात आली. यावेळी‎ टाळ, मृदंग वाजवत अनेक पालख्या‎ अडुळा बाजारात दाखल झाल्या होत्या.‎

जणू काही पंढरीच श्री क्षेत्र अडूळाबाजार‎ येथे अवतरली आहे असे वाटत होते. श्री‎ संत लहानुजी महाराज यांचे सोमवारी‎ अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरु‎ असताना निधन झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...