आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन सट्टेबाज ताब्यात:वरूड शहरात क्रिकेट सामन्यावरील ऑनलाइन सट्ट्यावर एलसीबीची धाड

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वरूड येथील नगर परिषद कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावरील ऑनलाइन सट्ट्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार, दि. १ नोव्हेंबर रोजी धाड टाकली. या कारवाईत २ सट्टेबाजांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख व ४ मोबाइल असा ८२ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अमोल पुंडलिकराव यावले (२७) रा. जरूड व प्रणय मुरलीधर धरमठोक (३७) रा. वरूड अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकातील क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन पद्धतीने सट्टा सुरू असल्याने पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके गस्तीवर होती. यावेळी नगर परिषद कॉम्प्लेक्स, वरूड येथे दोन जण विश्वचषकातील अफगाणिस्थान विरुद्ध श्रीलंका संघांमध्ये सुरू असलेल्या सामन्यावर मोबाइलद्वारे ऑनलाइन सट्टा खेळवत असल्याची माहिती पथकाला मिळाली.

या माहितीच्या आधारावर पथकाने या सट्ट्यावर धाड टाकली. या कारवाईत अमोल यावले व प्रणय धरमठोक यांना ऑनलाइन सट्टा खेळवताना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख व ४ मोबाइल असा एकूण ८२ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पतन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक नितीन चुकार व सुर सुसतकर, संतोष मुंदाने, दीपक सोनाळेकर, सुनील महात्मे, अमित वानखडे, शकील चव्हाण, उमेश वाकपांजर, सय्यद अजमत, नीलेश डांगोरे, पंकज फाटे, दिनेश कनोडिया व कमलेश पांपोर आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...