आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अवैध धंद्यांवर एलसीबीची कारवाई,‎ 60 हजारांचा मुद्देमाल केला जप्त‎

महागाव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अवैध धंद्यांवर‎ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने‎ मंगळवार, दि. १४ मार्च रोजी धाड‎ टाकुन आरोपींना अटक केली.‎ त्यांच्याकडून ६० हजारांचा मुद्देमाल‎ जप्त करण्यात आला आहे.‎ महागाव तालुक्यातील‎ हिवरा(संगम), गुंज, धनोडा,‎ बारभाई(तांडा) या ठिकाणी मटका‎ काउंटर खुलेआम चालू असल्याची‎ गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे‎ शाखेच्या पथकाला मिळाली होती.‎ प्राप्त माहितीच्या आधारावर स्थानिक‎ गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस‎ निरीक्षक अमोल सांगळे, उपनिरीक्षक‎ सागर भारस्कर, सुभाष जाधव,‎ सोहेल मिर्झा, पंकज पातुरकर, ताज‎ मोहम्मद, सुनिल पंडागळे, दिगंबर गिते‎ यांच्या पथकाने अवैध धंद्यांवर धाड‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ टाकुन विनोद उर्फ नाईस ठाकरे, अमर‎ राठोड, गजानन कदम, हरिभाऊ‎ काळे, गजानन पिटलेवाड, अरविंद‎ राठोड यांना अटक केली.‎ त्यांच्याकडून ५९ हजार ९२० रुपयांचा‎ मुद्देमाल जप्त केला.‎

पंधरा दिवसातील दुसरी‎ कारवाई‎ महागाव पोलिस स्टेशन अंतर्गत‎ येणाऱ्या हिवरा(संगम) येथील‎ मटका काउंटरवर १५ दिवसांपूर्वी‎ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने‎ कारवाई केली होती. या प्रकरणात‎ सुधा गुन्हा दाखल झाला होता.‎ तद्नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थेच‎ असल्याने या मटका व्यवसायाला‎ स्थानिक पोलिस प्रशासन सहकार्य‎ करीत असल्याचा आरोप नागरिक‎ करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...