आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:रासायनिक रंगांच्या दुष्परिणामावर राणा महाविद्यालयामध्ये व्याख्यान

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडनेरा येथील नारायणराव राणा महाविद्यालयाच्या भूगोल विभागाद्वारे धूलिवंदनानिमित्त ‘रासायनिक रंग व त्याचे दुष्परिणाम’ या विषयावर जनजागृती करण्यात आली. भूगोल विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश मुंदे यांनी रासायनिक रंग व त्याचे दुष्परिणाम तसेच नैसर्गिक रंगाचा वापर व नैसर्गिक रंगाचे स्त्रोत याविषयी माहिती देवून प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल वैराळे यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचा अपव्यय न करता होळी साजरी करण्याचे आवाहन केले. रासायनिक रंग व त्याचे दुष्परिणाम तसेच नैसर्गिक रंगाचा वापर व त्यांचे स्त्रोत याविषयी लहान मुले व नागरिकांमध्ये जनजागृती केली.

त्यासाठी एक विशेष पत्रक तयार करून ते वितरणाची जबाबदारी विद्यार्थांना देण्यात आली. प्राचार्यांच्या हस्ते विद्यार्थांना पत्रकाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिल चाळ, बस स्थानक, नवीवस्ती, जुनी वस्ती, बडनेरा पेट्रोल पंप, नांदुरा खुर्द, लोणी टाकळी, जळू, जनुना, जावरा, अंजनगाव बारी अशा अनेक ठिकाणी पत्रकांचे वाटप केले. या प्रसंगी डॉ. खुशाल अळसपुरे, डॉ. कल्पना मेहरे, डॉ. संगीता भांगडिया- मालानी, डॉ. संतोष बनसोड, डॉ. अंजली चेपे, डॉ. सचिन होले, डॉ. हर्षल निंभोरकर, प्रा. सतीश खोडे, प्रा. मनीष भडांगे, प्रा. हेमंत बेलोकार, प्रा. माधुरी म्हस्के, प्रशांत कठाळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...