आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेली समाज संघटनेचे आयोजन:संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त सोपान कनेरकर यांचे व्याख्यान, नांदगावकरांना मिळाली नवी ऊर्जा

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव पेठ येथील संत काशिनाथ महाराज सभागृहात युवा व्याख्याते सोपान कनेरकर यांच्या परिवर्तनवादी व्याख्यानाने नांदगावकरांना नवी ऊर्जा मिळाली. आजच्या वास्तववादी परिस्थितीवर कनेरकर यांनी प्रकाश टाकला असून समाजाने वैचारिक प्रगल्भता प्राप्त करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. अखिल तेली समाज संघटनेच्यावतीने या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभूदास फंदे हे होते. उद्घाटन माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव विवेक गुल्हाने, मोर्शीचे माजी नगराध्यक्ष कैलास फंदे, माजी जि. प. सदस्य नितीन हटवार, उमेश शिरभाते, सुनील ढोले, प्रतिभा फंदे, जयंत ढोले, प्रमोद सपकाळ, तैलिक समितीचे पदाधिकारी राजेंद्रभाऊ हजारे, सविता मसतकर, प्रियंका मसतकर, मुरलीधर मदनकर, शिल्पा हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. जिल्ह्यातील तेली समाजाचे सरपंच तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. मोझरी येथील सरपंच सुरेंद्र भिवगडे, नीलिमा समरीत, निंभारी येथील सरपंच बडवाईक इत्यादींना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व संत संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

उदघाटनपर भाषणात जगदीश गुप्ता यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक करत आपण सर्व समाजबांधवांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे म्हटले. आज मोबाईलमुळे संवादाचा अभाव निर्माण झाला असून अशा वैचारिककार्यक्रमांनी समाजात नक्कीच बदल घडेल, असा आशावाददेखील त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभूदास फंदे यांनी जगनाडे महाराज यांची जयंती ही सकारात्मक विचारातून होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. आजच्या पिढीला संत संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन संदीप अकोलकर यांनी केले.

अखिल तेली समाज संघटनेचे अमरावती विभाग प्रमुख संजय हिंगासपुरे यांच्यासह कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज हटवार, अंकुश साकोरे, सुनील धर्माळे, शिवा साठवणे, अनिकेत पारवी, अंकुश गभने, गोलू गभने, संतोष गडेकर, विनोद गभने, श्रीकृष्ण साकोरे, अतुल राजगुरे ,गणेश राजगुरे, किशोर शिरभाते, विनोद शिरभाते, बाळू शिरभाते, रामचंद्र पाटील, अमोल हटवार, किशोर ढोबरे, भारत वंजारी, शंकर बारबुदे, निलेश साठवणे, रवी चोपकर, एकनाथ चोपकर, चक्रधर हटवार, महादेव बानासुरे, चंदू गभने, संतोष गडेकर, रमेश साकोरे व समाजातील युवक युवतींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...