आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सर्पमित्र आणि वन विभागाच्या सहकार्याने सोडले अधिवासात; पावसाळ्यात नागरिकांनी घ्यावी काळजी

अमरावती2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सहा फुट अजगरासह दुर्मिळ कवळ्या सापाला जीवनदान

तीन दिवसापूर्वी भानखेडा परिसरातील एका शेतातून रेस्क्यू केलेल्या ६ फूट अजगराला उप वन संरक्षक अधिकारी यांच्या उपस्थितीत वडाळी वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगलात सोडण्यात आले. यावेळी वन कर्मचारी सर्पमित्र उपस्थित होते. तसेtच निमखेडा येथे सर्पमित्रांनी रेस्क्यू केलेल्या दुर्मिळ कवळ्या जातीच्या सापालाही वन परिक्षेत्रातील अधिवासात सोडून जीवनदान दिले.

तीन दिवसापूर्वी भानखेडा येथील प्रमिला जयदेव गोळे यांच्या शेतात जवळपास सहा ते साडेसहा फुटाचा अजगर बकरीची शिकार करतांना आढळून आला. याची माहिती वॉर संस्थेचे सर्पमित्र अभिजीत दानी यांना देण्यात आली. त्यांनतर दानी यांनी अजगराला रेस्क्यू केले. अजगर पकडल्याची माहिती वडाळी वनपरिक्षेत्राचे वनपाल श्याम देशमुख यांना देण्यात आली.

त्यांनतर वन विभागाने घटनास्थळी जाऊन अजगराला रेस्क्यू करून वडाळी वन वन परिक्षेत्रातील बांबू उद्यान येथिल सुश्रुषा केंद्रात आणले. येथे दोन दिवस अजगराला ठेवण्यात आले. तत्पूर्वी अजगराच्या हल्ल्यात मृत्य झालेल्या बकरीच्या शरीरातील हाडांचा पूर्णतः चुरा झाल्याने बकरीची जाग्या वरच मृत्यु झाला होता. ही बाब पंचनाम्यात उघडकीस आली. यामध्ये अजगराला ही काही इजा झाली तर नाही, यासाठी दोन दिवस सुश्रुषा केंद्रातील पिंजऱ्यात ठेवले. या दरम्यान अजगराला खाद्य म्हणून वनविभाकडून जिवंत कोंबडी ठेवली, मात्र, अजगराने त्या कोंबडीला कोणत्याही प्रकारची इजा केली नाही.

त्यामुळे कोंबडीला जीवनदान मिळाले. तत्पूर्वी वन विभाग फिरते पथक उप वन संरक्षक विनोद डेहनकर, वनपाल श्याम देशमुख, वनरक्षक प्रशांत खाडे, चंद्रकांत चौले, कैलाश इंगळे, वाहन चालक संदीप चौधरी, वन मजूर किशोर डहाके, वॉर संस्था अध्यक्ष नीलेश कंचनपुरे, प्रतीक माहुरे यांनी अजगराला वन परिक्षेत्रातील अधिवासात सोडण्यात आले.

हेल्पलाइन १९२६ वर करा संपर्क
पावसाळ्यात जमिनीच्या आत मधले वन्य जीव, सरपटणारे प्राणी बाहेर पडतात. पावसाचे पाणी जमिनीत घुसल्यामुळे सापा सारखे प्राणी मोठ्या प्रमाणात निघतात. यामुळे नागरिक घाबरतात. त्यामुळे याला न घाबरता सतर्क राहून वनविभाला अथवा वन्यजीव प्रेमींना सूचना द्यावी. तसेच वन विभागाच्या हेल्प लाइन नंबर १९२६ वर संपर्क करावा.
-विनोद डेहनकर, उप वन संरक्षक.

साप दिसल्यास सर्पमित्रांना कळवा
पृथ्वीवर मनुष्याप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. मात्र, कधी कधी मनुष्याच्या चुकीमुळे प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागते. पावसाच्या दिवसात वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी बाहेर येतात. या दिवसात मुख्यतः साप बाहेर निघतात. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्यामुळे सापाला इजा न करता वन विभाग किंवा सर्प मित्रांना सूचना द्यावी.
-नीलेश कंचनपुरे, अध्यक्ष, वॉर संस्था.

बातम्या आणखी आहेत...