आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय‎ सेवा योजना:गोटे महाविद्यालयात कायदेविषयक‎ मार्गदर्शन शिबिर, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद‎

वाशीम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व राष्ट्रीय‎ सेवा योजना पथकाच्या संयुक्त विद्यमाने दि. ४‎ फेब्रुवारी रोजी गोटे महाविद्यालयाच्या सभागृहात‎ कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.‎ कार्यक्रमाची सुरूवात संत गाडगेबाबा यांच्या‎ प्रतिमा पुजनाने झाली. प्रास्ताविक रा.से.यो.‎ कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विकास चांदजकर‎ यांनी केले. यावेळी अॅड. शुभांगी खडसे, जिल्हा‎ पोलिस दलातील सायबर विभागाचे दीपक, विधि‎ स्वयंसेवक सुशील भिमजियाणी यांनी विद्यार्थ्यांना‎ मार्गदर्शन केले. प्राचार्य जी. एस. कुबडे यांनी‎ प्रास्ताविक केले. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे‎ सचिव व्ही. ए. टेकवाणी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद‎ साधला. सूत्रसंचालन अंजली वानखेडे यांनी‎ केले. आभार मानवी वानखेडे यांनी मानले.‎ कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना पथकातील‎ विद्यार्थी, विधि स्वयंसेवक, अधिकारी व कर्मचारी‎ यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...