आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याचे दर्शन:महादेवखोरीत आढळले बिबट्याचे बछडे

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेलगत असलेल्या महादेवखोरी परिसरातील वन विभागाच्या भागात गुरुवारी (दि. १) सकाळी बिबट्याची दोन बछडे (पिल्लं) आढळली. ही माहिती वन विभागाच्या पथकाला मिळताच पथकाने घटनास्थळी जावून दोन्ही पिलांना ताब्यात घेऊन वडाळी परिसरातील रेस्क्यू केंद्रात आणले आहे.

महादेवखाेरी तसेच वडाळी लगतच्या नागरी वस्तीत यापूर्वी नागरिकांना बिबट दर्शन झालेले आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एक्सप्रेस हायवेवर असलेल्या पुलालगत वनविभागाने त्यांच्याच जागेत वृक्षारोपण केले आहेत. या झाडांमध्ये बिबटची दोन बछडे (पिल्लं) असल्याचे नागरिकांना दिसले. त्यांनी तत्काळ ही माहिती वन विभागाच्या पथकाला दिली. त्यामुळे वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पिल्लांच्या आजूबाजूने पाहणी केली मात्र मोठा बिबट नसल्याचे दिसले. त्यानंतर रेस्क्यू पथकाने दोन्ही पिल्लांना ताब्यात घेऊन वडाळी येथे वन विभागाच्या रेस्क्यू सेंटरला आणले आहे.

बातम्या आणखी आहेत...