आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकारीच्‍या प्रयत्‍नात स्‍वताच झाला शिकार:विद्युत तारेच्या स्पर्शाने बिबट्याचा मृत्यू, सेलू तालुक्यातील जयपूर येथील घटना

वर्धा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू तालुक्यातील जयपूर येथील बोर नदीच्या काठावर असलेल्या वन विभागाच्या नर्सरीजवळ माकडाचा कळप दिसताच भूक भागवण्यासाठी शिकार करण्याच्या प्रयत्नात उडी घेताच रोहित्रावरील विद्युत तारेला स्पर्श झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. वन्यप्राणी जंगलातून गावाकडे धाव घेत आहेत. बोर नदीच्या काठी एका बिबट्याने भूक भागवण्यासाठी माकडावर हल्ला चढवला. तो त्या ठिकाणी असलेल्या विद्युत विभागाच्या रोहित्रावरील तारांवर जाऊन अडकला. विजेचा प्रचंड धक्का बसल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी नर्सरीच्या शेजारी असलेले शेतकरी शेतात जात असताना त्यांना बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती पोलिस पाटील अमित फासगे यांना दिली. फासगे यांनी वन विभाग, महावितरण व पोलिसांना माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...