आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आयोगाचे निर्देश:आधार कार्डासोबत मतदान कार्ड लिंक करा : तहसीलदार मालठाणे

शेंदुरजनाघाटएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान कार्डाला आधार कार्ड लिंक करण्याचा कार्यक्रम राबवत आहे. त्या अनुषंगाने वरुड तालुक्यात मतदान कार्डाला आधार कार्ड लिंक करण्याचे काम बीएलओ तसेच व्होटर हेल्पलाईन ॲपमार्फत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदान कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्याचे आवाहन तहसीलदार गजेंद्र मालठाने यांनी येथील नगर परिषद येथे बैठकीत केले. बैठकीला नायब तहसीलदार, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक तथा निवडणूक विभागाचे अमोल ढोले, नरेंद्र वासनिक, माजी नगरसेवक विशाल सावरकर, भूपेंद्र कुवारे, जयप्रकाश भोंडेकर, मंगलू पंधराम, बीएलओ, शिक्षक आदींसह नगर परिषद कर्मचारी उपस्थित उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...