आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू जप्त:हॉटेल किचन 365 मधून एक लाखाची दारू जप्त

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

थर्टी फर्स्टला विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या हॉटेल किचन ३६५ वर राजापेठ पोलिसांनी रात्री १० वाजता धाड टाकली. या कारवाईत १ लाख ५ हजार ३०५ रुपयांचा दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मावळत्या वर्षाला निरोप व नववर्ष स्वागताचा जल्लोष करण्याकरिता हॉटेल किचन ३६५ मध्ये ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती. परंतु, येथे ग्राहकांना अवैधरीत्या दारू विक्री करण्यात येत असल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी या हॉटेलवर धाड टाकली. झडती दरम्यान हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारूच्या ३४६ बाटल्या आढळून आल्या.

सदर १ लाख ५ हजार ३०५ रुपयांचा दारूसाठा जप्त करून पोलिसांनी परवान्याबाबत विचारणा केली. मात्र, हॉटेलकडे दारू विक्रीचा कुठलाही परवाना आढळून आला नाही. त्यामुळे हॉटेलमालक महेश मोहनलाल छाबडा (४८) रा. हरदासराम सोसायटी व व्यवस्थापक भावेश मुरलीधर डेंबला (२८) रा. सिंधूनगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक विजयकुमार वाकसे, मनीष करपे, अतुल संभे, रवी लिखितकर, दानिश शेख, सागर भजगवरे आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...