आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 फेब्रुवारीपर्यंत पुन्हा मुदतवाढ:आरटीईतील शाळा नोंदणीला‎ अमरावती शहरात अल्प प्रतिसाद‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक दुर्बल घटकातील‎ पालकांच्या पाल्यांना इंग्रजी‎ माध्यमातील प्रवेशाकरिता जिल्ह्यात‎ आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरूवात‎ झाली असून, शासनाच्या‎ आदेशानुसार याकरिता ३‎ फेब्रुवारीपर्यंत शाळांची नोंदणी करणे‎ गरजेचे होते. मात्र, या नोंदणीला‎ शहरातील शाळांचा ‘नो रिस्पॉन्स’‎ असल्याचे दिसून आले. या ९‎ दिवसांत २४२ शाळांपैकी केवळ‎ शंभर शाळांचीच नोंदणी झाली‎ आहे.

त्यामुळे शाळा नोंदणीला‎ शिक्षण विभागाकडून १०‎ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दि ली आहे.‎ बालकांचा मोफत व सक्तीच्या‎ शिक्षणाचा अधिकार अधिनियम‎ २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के‎ प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात‎ ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येते.‎ त्यानुसार वर्ष २०२२-२३ शैक्षणिक‎ वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश‎ प्रक्रियेची ऑनलाइन सोडत काढून‎ राज्यात ९० हजार ६८८ विद्यार्थ्यांची‎ निवड यादी आरटीई पोर्टलवर‎ जाहीर केली होती. मागील वर्षी‎ जिल्ह्यात ३२३ पैकी २४० शाळांची‎ नोंदणी झाली होती.

तर २ हजार २३९‎ पाल्यांकरिता जागा रिक्त‎ दाखवण्यात आल्या होत्या. परंतु‎ प्रवेशाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत‎ यातील काही जागा रिक्त राहिल्या‎ होत्या. त्यामुळे यंदा शासनाकडून‎ १०० टक्के प्रवेश करण्यासाठी‎ लवकर सुरुवात करण्यात आली‎ आहे. वर्ष २०२३-२४ साठी प्रक्रिया‎ सुरू करीत पहील्या टप्प्यात‎ शाळांची नोंदणी हाती घेण्यात आली‎ आहे. ही नोंदणी २३ जानेवारी ते ३‎ फेब्रुवारी दरम्यान करायची होती.‎ परंतु ३ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील‎ २४२ शाळांपैकी शंभर शाळांचीच‎ नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले‎ आहे. जोपर्यंत शाळा नोंदणीचा टप्पा‎ पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया‎ राबवणे अशक्य आहे.‎

बातम्या आणखी आहेत...